Thursday, July 29, 2021

मी लसं घेतली... मी लसं घेतली...

(मी कात टाकली च्या चालीवर, श्री ना धो महानोरांची माफ़ी मागुन)

मी लसं घेतली... मी लसं घेतली...
मी मुडक्या क्वारंटीनची बाई लाज टाकली
मी लसं घेतली... मी लसं घेतली... मी लसं घेतली...

करोना काळात, करोना काळात चावंळ चावंळ चालती
भर लॉकडाउनात, तोंड लपवत चालती
करोना काळात, करोना काळात काळात ग काळात ग
मी लसं घेतली... मी लसं घेतली... मी लसं घेतली...

ह्या कोविड-वरती, मी शील्ड पांघरती
मी अनलॉक मोरनी बाई, चांदन्यात न्हाती
मी लसं घेतली... मी लसं घेतली... मी लसं घेतली...
करोना काळात, करोना काळात काळात ग काळात ग
मी लसं घेतली... मी लसं घेतली... मी लसं घेतली...

अंगात माझिया भिनलाय एंटी-बॉडीया
मी भिंगरभिवरी त्याची को मुक्त झाली
मी चीनी मनमानी बाई झुगारून दिली

मी लसं घेतली... मी लसं घेतली...
मी मुडक्या क्वारंटीनची बाई लाज टाकली